पराभूत जनरल मुनीरला पाकिस्तानने बनवले फील्ड मार्शल!   

इस्लामाबाद : भारताकडून पराभव पत्करल्यानंतरही पाकिस्तान सरकारने मंगळवारी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीरला फील्ड मार्शल पदावर बढती देण्याचा निर्णय घेतला. फील्ड मार्शल पदावर पोहोचलेले मुनीर हे पाकिस्तानच्या इतिहासातील दुसरे लष्करी अधिकारी ठरले आहेत. पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जनरल मुनीर यांना बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे पाकिस्तान सरकारने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. जनरल अयुब खान यांच्यानंतर मुनीर हे पाकिस्तानातील सर्वोच्च लष्करी पदावर पोहोचलेले पहिले लष्करी जनरल आहेत. १९५९ मध्ये जनरल खान यांना फील्ड मार्शल ही पदवी देण्यात आली होती. देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मुनीर यांनी उच्च व्यूहरचना आखली. याबद्दल पाकिस्तान सरकारने जनरल असीम मुनीर (निशान-ए-इम्तियाज मिलिटरी) यांना फील्ड मार्शल पदावर बढती देण्यास मान्यता दिली आहे.

Related Articles